Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, टायर फुटल्यानंतर कार 3 वेळा उलटली

Samruddhi Highway Accident: या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे आहे.
Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway AccidentSaam TV

मनोज जयस्वाल

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरुच आहे. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास टायर फुटल्याने कारचा अपघात झाला आहे, वाशिमच्या मालेगांवच्या टोलनाक्यापासून ५०० मीटर आतंरावर गाडीचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे आहे.

तीन दिवसात समृद्धी महामार्गवर टायर फुटल्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. मात्र या तीन अपघातात आतापर्यंत दहा जण जखमी झाले आहेत. (Latest News Update)

Samruddhi Highway Accident
Sanjay Raut News Today: २०२४ मध्ये ED कार्यालयात कोणाला पाठवायचं याच्या याद्या तयार करू; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

मालेगावहून मुंबईकडे जात असताना टोल नाका पार करताच ५०० मीटर आंतरावर गाडीचा टायर फुटल्याने गाडीने तीन वेळी पलटी झाली. तीन जण यात जखमी झाले आहेत. वैष्णवी ठाकुर (वय १९ वर्ष), अंकुश पुसदकर (वय ५५ वर्ष), आयातसिंग ठाकुर (वय ५१ वर्ष)अशी जखमींची नावं आहेत. (Accident News)

Samruddhi Highway Accident
Kalyan Crime News: काळा तलाव परिसरात तुफान राडा; अल्पवयीन मुलांनी केले चाकूने वार, थरारक घटनेचा व्हिडिओ VIRAL

अपघातानंतर नागरिकांनी तातडीने १०८ वर फोन करताच आवघ्या काही मिनिटात रुग्नवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रूग्नवाहिकेत अपघातामधील जखमींना सर्वतोपरी उपचार देण्यात आले आणि पुढील उपचाराकरिता क्रिटिकल हॉस्पिटल वाशिम येथे भरती केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com