Samruddhi Mahamarg News
Samruddhi Mahamarg NewsSaam Tv

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात १ हजार कोटींचा घोटाळा? काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

Samruddhi Mahamarg News : जालना-नांदेड या समृध्दी महामार्गासाठी जमीन संपादित करताना सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षाअधिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे.

Samruddhi Mahamarg News : जालना-नांदेड या समृध्दी महामार्गासाठी जमीन संपादित करताना सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जालना विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. या घोटाळ्यात जालना आणि परभणी जिल्ह्यातील काही माजी मंत्र्यांसह दलालांचा सहभाग आहे. त्यामुळे या घोटाळ्याची तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. (Maharashtra Breaking News)

Samruddhi Mahamarg News
Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार; प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार गोरंट्याल यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातील विविध विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडून राज्य शासनाचे लक्ष वेधले. सभागृहात बोलतांना आमदार गोरंटयाल म्हणाले, की जालना-नांदेड या समृध्दी महामार्गासाठी (Samruddhi Mahamarg)  संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अदाईवर ज्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यापेक्षा कमी खर्च हा महामार्गाच्या कामासाठी लागणार आहे. या समृध्दी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षापूर्वी लिक झाल्याचा गंभीर आरोपही गोरंट्याल यांनी केला.  

सदर महामार्ग होणार याची कल्पना असल्यामुळे त्यासाठी कोणत्या भागातील जमीनी संपादित होणार आहे, याबाबत जालना आणि परभणी जिल्ह्यातील काही माजी मंत्री आणि दलालांना माहिती मिळाल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वीच गोरगरीब शेतकऱ्यांकडून जमीनी कवडी मोल भावात खरेदी केल्या. त्यानंतर रातोरात तेथे फळबागा दाखवल्या, असा आरोपही गोरंट्याल यांनी केला आहे. त्याचबरोबर या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी देखील, आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg News
Breaking News : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची मोठी कारवाई; माहीमच्या समुद्रातील अनाधिकृत बांधकाम हटवलं

ईडी चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीला पुन्हा सभापती करण्याचा घाट

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईडीने वर्षभरापूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला. ज्या सभापती आणि संचालक मंडळावर हा गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला त्याच व्यक्तीला पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती करण्याचा घाट राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.असा घणाघातही कैलास गोरंट्याल यांनी केला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com