Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam Tv

Samruddhi Mahamarg Accident: समृध्दी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात, 2 जखमी...

या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनोज जयस्वाल, वाशिम

Washim Accident News Today: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आज (3 जून) समृद्धी महामार्गावर पुन्हा एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident
Buldhana News: कोंबिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी

अपघात नेमका कसा झाला?

समृद्धी महामार्गावर कारचा समोरचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लोकेशन १८७ वर झाला आहे. कारच्या समोरचा टायर फुटताच कार डिव्हायडरला धडकल्याने कारचे मागील टायर सुद्धा फुटले.

Samruddhi Mahamarg Accident
Pune Crime News: अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून अत्याचार; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ 108 समृद्धी लोकेशन कारंजा पायलट विधाता चव्हाण, डॉ. गणेश यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले आहे. पुढील उपचारासाठी रुग्णांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. दोन्ही जखमी हे जालना जिल्ह्यातील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com