Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला, थरकाप उडवणारा VIDEO

केमिकलने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन थेट पुलावरून खाली कोसळला. पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident News Saam TV

Samruddhi Mahamarg Accident News : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव स्कॉर्पिओ उलटून एक जण ठार

समृद्धी महामार्गाला (Samruddhi Mahamarg) लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगरजवळील फतियाबाद परिसरात केमिकलने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन थेट पुलावरून खाली कोसळला. पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या भयंकर घटनेत ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त (Accident) ट्रक शिर्डी येथून नागपूरच्या दिशेने केमिकल बॅरल घेऊन निघाला होता. ट्रक वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुलवडी परिसरात आला असता समृद्धीच्या पूल जवळ कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी चालकाला दिसले नाही.

त्यामुळे ट्रक पुलाच्या मधोमध असलेल्या पोकळी मधून थेट खाली कोसळला. पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. या घटनेत ट्रकमधील चालकासह सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, केमिकल ट्रक असल्यामुळे वेळेवर आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आलं.

ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, औरंगाबाद येथून महापालिकेच्या अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणली. तीन दिवसात पुलावरून वाहन पडण्याची ही दुसरी घटना असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com