
Samruddhi Mahamarg Accident News: राज्याच्या विकासाला सुसाट वेग मिळाल्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात असलेला समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात वाहतुकीच्या दृष्टीने मात्र असुरक्षित ठरत आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. समृद्धी महामार्गावर आज (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला आहे. (Latest Marathi News)
नागपूरहून मेहेकरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हाडरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर हद्दीत हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जखमींना तातडीने उपचारासाठी नांदगांव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
पघाग्रस्तांची नावे कळू शकलेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार नागपूरहून मेहेकरच्या दिशेने निघाली होती. कार अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर हद्दीत आली असता, वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली.
काही कळण्याच्या आतच कार दोन ते तीन वेळा उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून समृद्धी अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी वाहनाचा वेग कमी ठेवावा, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.