Samruddhi Mahamarg Accident: भरधाव कारचा टायर फुटला अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, पाहा VIDEO

Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटला. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन उलटली.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident NewsSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग गांधीगिरी करत आहे. मात्र, विभागाचे हे प्रयत्न फोल ठरताना दिसून येत आहे. समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटला. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन उलटली.  (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident News
Cotton Market Price: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! तुरीच्या दराने गाठला १० हजारांचा टप्पा; कापसाचा भावही वाढणार?

या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी सिंदखेडराजा (Buldhana) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (१८ मे) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार ही नागपूरवरून शिर्डीच्या दिशेने जात होती. कार सिंदखेड राजा एक्सचेंज नजिक मुंबई कॉरिडॉरजवळ आली असता टायर गरम होऊन अचानक फुटला.

त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भयानक अपघातात कारमधील दोघे जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident)  मालिका सुरूच असून, अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात आता ‘इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर’ या अत्याधुनिक प्रणालीची भर पडणार आहे. अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.

कुठे बसवणार?

शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंतचा ८० किमी लांबीचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

या टप्प्यात इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर बसविण्याचे काम सुरू आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पट्ट्यातही इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर प्रणाली बसवली जाणार आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com