Samruddhi Mahamarg Traffic Update: समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक जॅम! कमान कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

समृद्धी महामार्गाच्या ट्रॅफिक जॅमबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जालन्यात वादळी वाऱ्यामुळं समृद्धी महामार्गावरील कमान कोसळल्याची घटना घडली आहे.
Samruddhi Mahamarg Traffic Update
Samruddhi Mahamarg Traffic UpdateSaam tv

Jalna News: समृद्धी महामार्गाच्या ट्रॅफिक जॅमबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जालन्यात वादळी वाऱ्यामुळं समृद्धी महामार्गावरील कमान कोसळल्याची घटना घडली आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने रस्त्यावर वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे. त्याचा फटका वाहनधारकांना बसला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात वादळी वाऱ्यामुळे समृद्धी महामार्गावरील कमान कोसळ्याची घटना घडली आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.

वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरावरील पत्रे व जालन्यातील समृद्धी महामार्गावर कॅरिडोर क्रमांक ४५३ वरील कमान कोसळल्याची घटना घडली. ही घटनेची माहिती कळताच महामार्गावरील पोलिसांनी तात्काळ दाखल होत वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

Samruddhi Mahamarg Traffic Update
Pune Rain News: पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांची पळापळ, वातावरणात गारवा

पोलिसांनी कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून दक्षता घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कमाल हटविण्याचे काम सुरू केले आहे. ही कमान अवजड असल्याने ही कमान हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आला आहे.

दरम्यान, वाहनांच्या लांबच रांगा लागल्यामुळे वाहनातून बाहेर पडून रस्त्यावर आले आहेत. अनेक जण वाहतुकीची कोंडी कशी फोडता येईल, याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर वाहनचालक आणि प्रवासी जमल्याचे दिसून येत आहे.

Samruddhi Mahamarg Traffic Update
Maharashtra Rain Alert: राज्यातील काही भागात विजांसह पाऊस कोसळणार; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार

नगर जिल्ह्यात टोलनाका कोसळला

अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुसाट्याचा वारा सुरू झाला आहे. जोरदार वादळामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातील टोलनाका कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याण- निर्मल महामार्गावरील पत्र्याचा टोल नाका जोरदार वाऱ्यामुळे कोसळला आहे.

सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, तर टोल नाक्यावरील कर्मचारी देखील सुखरूप आहेत. टोलनाका कोसळल्याने नाक्याचं मोठं नुकसान झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com