रायगड जिल्ह्यात माणगाव व रोहा येथे शवागृहाला मंजुरी

पालकमंत्री अदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने माणगाव आणि रोहा येथे शवागृह मंजूर करण्यात आलेले आहे. या शवागृहात दोन मृतदेह ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यात माणगाव व रोहा येथे शवागृहाला मंजुरी
रायगड जिल्ह्यात माणगाव व रोहा येथे शवागृहाला मंजुरी राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात घडून प्रवाशांचा जीव जाण्याच्या घटना नेहमी घडत असतात. त्याचबरोबर बुडून किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूच्या घटना घडत असतात. अशावेळी मृत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक येईपर्यत मृतदेह हे महामार्गाजवळ रुग्णालयात शवागृह नसल्याने तसेच ठेवले जात होते. Sanction for mortuaries at Mangaon and Roha in Raigad district

हे देखील पहा -

त्यामुळे अनेकवेळा मृतदेहाची हेळसांड होत होती. मात्र आता मृतदेहांची हेळसांड थांबणार असून माणगाव आणि रोहा येथे जिल्हा नियोजन योजनेतून शवागृह मंजूर करण्यात आले आहेत. दोन मृतदेह ठेवण्याची सुविधा या शवागृहात करण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे. सद्यस्थितीत अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातच शवागृहाची सुविधा आहे. रोहा आणि माणगाव येथे शवागृह मंजूर झाल्याने मृतदेहाची होणारी हेळसांड थांबणार आहे.

रायगड जिल्ह्यात माणगाव व रोहा येथे शवागृहाला मंजुरी
दरड कोसळण्याच्या घटनांना भूमाफिया जबाबदार - प्रवीण दरेकर

रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा हा महामार्ग जातो. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांचे अपघात होण्याच्या घटना सतत घडत असतात. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अपघातानंतर सर्व सोपस्कर आटोपल्यानंतर मृतदेह हे जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले जातात. मात्र महामार्गावरील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शवागृहाची सुविधा नसल्याने अनेक वेळा मृतदेह ठेवण्याची कुचंबणा होत असे. नातेवाईक येईपर्यंत मृतदेह हे रुग्णालयात शवागृह नसल्याने तसेच ठेवावे लागत होते.

मृतदेहाची होणारी हेळसांड थांबावी यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने माणगाव आणि रोहा येथे शवागृह मंजूर करण्यात आलेले आहे. या शवागृहात दोन मृतदेह ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मृतदेहाची हेळसांड थांबणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com