घोगरगावच्या वीज उपकेंद्रास मिळाली मंजुरी

घोगरगावच्या वीज उपकेंद्रास मिळाली मंजुरी
महावितरण

अहमदनगर : नेवासे तालुक्यातील घोगरगाव येथील 33 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून, कामाची सुरवात झाल्यावर ते एका वर्षात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

मुंबई येथे मंत्रालयात गुरुवारी (ता. ९) राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, महापारेषणचे प्रकल्प संचालक राजूरकर, कार्यकारी संचालक भडीकर, इन्फ्राचे अधीक्षक अभियंता प्रवीण परदेशी, नगरचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, लक्ष्मण काकडे तसेच नेवासे उपअभियंता भाऊसाहेब बडे, शरद चेचर आदी बैठकीस उपस्थित होते. Sanction for power substation at Ghogargaon

महावितरण
डाळिंबाचे हेक्टरमध्ये ४२ टनांचे उत्पादन

या कामाबरोबरच तालुक्यातील सोनई जवळील धनगरवाडी येथील 33 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मंजूर आहे. या कामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध झाल्यानंतर या उपकेंद्राचे कामही लवकरात लवकर हाती घेतले जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील तामसवाडी, खुपटी, रांजणगाव देवी, प्रवरासंगम या ठिकाणीही ३१ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र प्रस्तावित आहे.

या उपकेंद्राला शासनस्तरावर निधीची उपलब्धता झाल्यानंतर हे काम हाती घेतले जाईल. मात्र, दरम्यानच्या काळात या सर्व ठिकाणच्या उपकेंद्राचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर माका, घोडेगाव, चांदे, बेलपिंपळगाव येथे सध्या अस्तित्वात असलेले उपकेंद्र सातत्याने अतिभाराने चालत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे मंत्री गडाख यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर या उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्याच्या सूचना बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

प्रवरासंगम व आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी बऱ्याच वर्षांपासूनची प्रवरासंगम येथे 33 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र व्हावे अशी मागणी होती त्यावर बैठकीत चर्चा होऊन या ठिकाणचा तत्काळ सर्वेक्षण करण्यात येऊन प्रस्ताव संबंधित विभागास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर तालुक्यातील काही ठिकाणी अद्यापही लोक सिंगल फेज योजनेच्या लाभापासून वंचित होते त्यांनाही या योजनेचा लाभ व्हावा.Sanction for power substation at Ghogargaon

यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात सर्व ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात येऊन ज्या उपकेंद्रामध्ये एसडीटी ट्रान्सफॉर्मर बसवायचे राहिले आहे, त्या ठिकाणी ते बसविण्यात येतील यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद ऊर्जा विभागाच्या मेंटेनन्स हेडमधून करण्यात येईल. तसेच, तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची 2-3 खांबांवर नवीन वीजजोडाची मागणी होती. त्यावर बैठकीत चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com