काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील घनिष्ठ संबंधावरून टीका टिपणी

सांगली जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील घनिष्ठ संबंधावरून टीका टिपणी
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील घनिष्ठ संबंधावरून टीका टिपणीSaam TV

सांगली:- सांगली जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस आहे. आज महाविकास आघाडी तर्फे प्रचार सुरू करण्यात आला आहे. याच प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यामधील संबंध अनेकांनी बोलून दाखवले. आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे.. महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेल तर्फे आज सांगलीच्या मिरजेत प्रचार सभा पार पडली. यावेळी मंत्री जयंत पाटील आणि मंत्री विश्वजित कदम हे उपस्थित होते. तर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार ही उपस्थित होते. 

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील घनिष्ठ संबंधावरून टीका टिपणी
प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार- नाना पटोले

काँग्रेसचे नेते आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील म्हणाले जयंत पाटील यांच्या माघे मी 2002 सालापासून लागलो होतो. मला संचालक करा, असे भाष्य विशाल यांनी केले यावर जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी भाष्य केले. विशाल पाटील यांचा विजय चांगल्या आणि भक्कम पणाने व्हावा असे मी या ठिकाणी सांगतो. आमचे 21 उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या अशी विनंती करतो. असे जयंत पाटील म्हणाले, तसेच काँग्रेसचे स्वर्गीय माजी मंत्री आणि नेते मदन पाटील यांचे आणि आमचे एवढं जुळले होते असेही पाटील म्हणाले.

नोटा बंदी वेळी आमचे 14 कोटी रिजर्व्ह बँकेने परत दिल्या नाहीत. काही कारखाने सूत गिरण्या बंद पडलेले आहेत. यात काय मार्ग काढायचा हा प्रश्न संचालकांसमोर आहे. काही ठिकाणी समोरच्या पॅनेलमध्ये आमची माणसं विरोधी म्हणून उभे आहेत. त्यांना मी बंडखोर म्हणणार नाही. पण आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे असे जयंत पाटील म्हणाले.

विशाल पाटील म्हणाले 2002 पासून जयंत पाटील यांच्या माघे लागलो. संचालक पदासाठी हे जाहीर केले. तर 2002 पासून तुमचे सेटिंग आहे हे आता आम्हाला कळले असा चिमटा ही विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना काढला.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com