Sangamner Crime News : 'जलजीवन' ची पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

त्याच्याकडील चोरीचे पाईप तीन ट्रकमध्ये भरून नगर जिल्ह्यात आणले.
Sangamner
Sangamnersaam tv

- सचिन बनसाेडे

Sangamner News : संगमनेर येथील जलजीवन मिशन योजनेच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून शिवकुमार सरोज याच्यासह त्याच्या 12 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशियतांकडून पाईपने भरलेले तीन ट्रक हस्तगत करण्यात आले आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Sangamner
Khambatki Ghat News: पुण्याला निघालात? खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक दाेन तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या कारण

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे सह 20 गावांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलजीवन मिशन योजनेतून सुरू आहे. या कामासाठी आणलेले 43 लाख पाच हजार 523 रुपयांचे लोखंडी पाईप चोरीस गेले होते.

Sangamner
Aam Aadmi Party News: "दादा, मुंबईत पोचलासा काय? काेल्हापूरातून 'आप' युवा आघाडीचा अजित पवारांना प्रश्न; जाणून घ्या आंदाेलन

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने उत्तर प्रदेशातील गौरीयाबाद येथे सापळा रचून शिवकुमारला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चोरीचे पाईप तीन ट्रकमध्ये भरून नगर जिल्ह्यात आणले.

यात 34 लाख 76 हजार 364 रुपये किमतीचे 367 लोखंडी पाईपांचा समावेश आहे. शिवकुमारला पथकाने संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणातील त्याच्या 12 साथीदारांना पथकाने ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com