Karnataka Maharashtra Border Dispute: भाजप विरोधात मित्र पक्षाचेच आंदोलन; बाळासाहेबांच्‍या शिवसेनेतर्फे जोडेमारो आंदोलन

भाजप विरोधात मित्र पक्षाचेच आंदोलन; बाळासाहेबांच्‍या शिवसेनेतर्फे जोडेमारो आंदोलन
Karnataka Maharashtra Border Dispute
Karnataka Maharashtra Border DisputeSaam tv

सांगली : कर्नाटक– महाराष्‍ट्र सिमा वाद सुरू आहे. या वादात मिरजेत बाळसाहेबांची शिवसेनेतर्फे (Shiv Sena) कर्नाटकचे भाजप मुख्यमंत्री बोमाई यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तसेच (BJP) भाजप मित्र पक्षा विरोधात निषेध केला. (Tajya Batmya)

Karnataka Maharashtra Border Dispute
Amaravati News: विद्युत अभियंतासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे आंदोलन

कर्नाटक सिमा वाद पुन्हा (Sangli) उफाळून आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेलेल्या गाड्या फोडल्यामुळे महाराष्ट्र सरकारमधील भाजप मित्र पक्ष बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. आज कर्नाटक (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोमई यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाराणा प्रताप चौक या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले.

प्रतिमेस मारले जोडे

कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या डिजिटल फलकाला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना मित्र पक्ष असला तरी मराठी माणसांवर केलेला अन्याय कधीही सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com