रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलली आटपाडीची यात्रा!

आटपाडीचे ग्रामदैवत श्री. उत्तरेश्वराची पौर्णिमेपासून यात्रा सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त शेळ्या-मेंढ्या आणि बकऱ्यांची मोठी यात्रा भरवली जाते.
रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलली आटपाडीची यात्रा!
रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलली आटपाडीची यात्रा! विजय पाटील

सांगली : सांगलीच्या आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भरलेल्या शेळ्या मेंढ्या आणि बकऱ्याच्या यात्रेत विक्रमी साडेचार हजारावर आवक झाली आहे. यात्रास्थळ रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलले होते. लाखोंची उलाढाल या यात्रेत झाली आहे. आटपाडीचे ग्रामदैवत श्री. उत्तरेश्वराची पौर्णिमेपासून यात्रा सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त शेळ्या-मेंढ्या आणि बकऱ्यांची मोठी यात्रा भरवली जाते. पश्चिम महाराष्ट्रात शेळ्या मेंढ्या आणि बकऱ्याच्या यात्रेसाठी आटपाडीची यात्रा प्रसिद्ध आहे.

हे देखील पहा :

यंदाही बाजार समितीच्या आवारात पर्वापासून शेळ्या- मेंढ्या आणि बकऱ्या दाखल झाल्या आहेत. यात्रेत काल मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मेंढ्या आणि बकरे आणले होते. गेली दीड वर्षे नेक गावच्या यात्रा बंद असल्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच भरलेल्या आटपाडीच्या यात्रेत यंदा विक्रमी साडेचार हजारावर आवक झाली आहे.

रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलली आटपाडीची यात्रा!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल
रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलली आटपाडीची यात्रा!
"अंघोळ केल्यावर पाप धुवून जाईल" म्हणत 18 वर्षाच्या मुलीवर मौलवीकडून बलात्कार!
रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यांनी फुलली आटपाडीची यात्रा!
नगरमध्ये 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून मारहाण करत बलात्कार!

हौशी शेतकरी जातिवंत आणि दर्जेदार मेंढ्या आणि बकऱ्यांना झुली पांघरून रंगवून वाद्यांच्या गजरात बाजारात घेऊन आले आहेत. बाजार समितीच्या आवारात वाद्यांच्या गजरात मेंढ्या आणि बकऱ्यांचे कळप दाखल होत होते. मेंढ्या आणि बकऱ्याच्या निवाऱ्यासाठी मंडप उभारण्यात आलेले आहेत. यात्रेत सांगली, सातारा, सोलापूर,  कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. तर खरेदीसाठी कोल्हापूर, पुणे, गोवा येथून व्यापारी दाखल झाले होते. यामध्ये जातिवंत लाखो रुपयांच्या मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com