सांगली : प्रतीकात्मक तिरडीसह भाजप नगरसेवक घुसले महासभेत
bjp corporators sangli

सांगली : प्रतीकात्मक तिरडीसह भाजप नगरसेवक घुसले महासभेत

सांगली : मिरज येथील अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी भाजप नगरसेवकांनी पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीसाठी आज (साेमवारी) महापालिकेच्या महासभेत तिरडी घेऊनच भाजप नगरसेवकांनी प्रवेश करत कारवाईची मागणी केली. याबराेबरच भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. (sangli-bjp-corporator-demands-enquiry-apex-hospital-protests-sml80)

मिरजच्या अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यूप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालयाला परवानगी देणार्‍या आयुक्त व महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या चौकशी करत कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज (साेमवार) सांगली महापालिकेसमोर आंदोलन केले.

भाजप नगरसेवकांनी bjp corporators sangli आज (साेमवार) पार पडणाऱ्या महासभेत थेट प्रतीकात्मक तिरडी घेऊन घुसत पालिकेने रूग्णालयाला परवानगी दिलीच कशी ? हा मुद्दा उपस्थित करत या सर्व प्रकरणी चौकशीची मागणी करत आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

bjp corporators sangli
लस घेतलेल्यांसाठी भरघाेस सवलत; काेल्हापूरात दुकाने सुरु

दुसर्‍या बाजूला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महासभा सुरू असताना पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत प्रतीकात्मक तिरडी ठेवून आंदोलन केले आहे. यावेळी महापालिका आरोग्य अधिकार्‍यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरचिटणीस दीपक माने यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com