लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकाने सुरु करू - संजय काका पाटील
लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकाने सुरु करू - संजय काका पाटील विजय पाटील

लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकाने सुरु करू - संजय काका पाटील

भाजपचे आमदार खासदार मार्केट मध्ये जाऊन दुकाने उघडतील, असा इशारा सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यामधील लॉकडाऊन उठवा, येत्या दोन दिवसात यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर, भाजपचे आमदार खासदार मार्केट मध्ये जाऊन दुकाने उघडतील असा इशारा सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हे देखील पहा -

गेल्या जवळपास दीड वर्षापासून हा लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे आता लोकांची सहनशीलता संपली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प आहे, व्यापार बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. हे किती दिवस सहन करायचे असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी केला.

लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकाने सुरु करू - संजय काका पाटील
तासगावमध्ये थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

एकीकडे कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. वाळवा, कडेगाव व पलूस या तालुक्यातील कोरोना स्थितीची शिक्षा इतर तालुक्यांनी का घ्यावी असा सवाल देखील त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या तालुक्यात रुग्ण संख्या कमी आहे, अश्या तालुक्यातील दुकाने उघडण्यात यावीत. तसेच कोरोनाच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी काम केले नाही आणि जनतेला वेठीस धरण्याच काम केले अश्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.