गणराया! सरकारला सुबुद्धी दे; सर्वपक्षीयांचे घंटानाद आंदाेलन

गणराया! सरकारला सुबुद्धी दे; सर्वपक्षीयांचे घंटानाद आंदाेलन
sangli

सांगली : पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगचे धान्य, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना महापूर नुकसान भरपाई अनुदान आणि ज्यांचे पंचनामे अजून पर्यंत झाले नाहीत त्यांना देखील मदत मिळावी यासाठी आज (बुधवार) सांगली येथे सर्वपक्षीय कृती समितीने घंटानाद आंदाेलन छेडले. sangli-citizens-protests-against-maharashtra-government-for-flood-area-affected-help-sml80

महाराष्ट्रातील सरकारला सुबुद्धी दे असे साकडं सांगलीच्या गणरायाला आंदाेलकांनी घातले. या आंदोलनात नागरिक, व्यापारी तसेच शेतकरी बांधव सहभागी झाले हाेते. सांगलीत महापूर येऊन तीन-चार महिने उलटले तरी अद्याप पूरेशी मदत न मिळाल्याने हे आंदाेलन छेडण्यात आले.

sangli
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिमये भारतीय संघाची कॅप्टन

यावेळी आंदाेलकांच्यावतीने सतीश साखळकर म्हणाले मंत्र्यांनी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी पूरग्रस्त भागाचा दाैरा केला. हे सर्वजण पर्यटनास आले होते की काय असा प्रश्न पडला पूरग्रस्तांना पडला आहे. अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नाहीत. कोणतेही मदत मिळाली नाही. त्यामुळे या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सर्व पक्षीय कृती समितीने हे घंटानाद अनोखे आंदोलन केले आहे. 

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com