'हार्ट ऑफ सिटी'त वेश्या व्यवसाय; महिलेस सात वर्षे सक्तमजुरी

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.
'हार्ट ऑफ सिटी'त वेश्या व्यवसाय; महिलेस सात वर्षे सक्तमजुरी
Court Order

सांगली : सांगली (sangli) शहरातील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात कुंटणखाना चालवणाचा आराेप सिद्ध झाल्याने स्मिता पाटील हिला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Court Order
२ दिवसात जुळणी हाेईल; 'महाविकास'च्या सतेज पाटलांना विश्वास

स्मिता पाटील गरजवंत मुलींना पैसे देण्याचे अमिष दाखवून स्वतः च्या फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होती. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या पथकाने सन २०१९ कालावधीत बनावट ग्राहक पाठवून तिच्या कुंटणखान्यावर छापा टाकला हाेता.

त्यावेळी स्मिता पाटील वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. तिच्यावर कारवाई करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर साक्षी पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने महिलेस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन हजार दंडाची शिक्षा सुनावण्याली आहे अशी माहिती न्यायालयातून देण्यात आली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com