Sangli Crime: मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडित तरुणी ६ महिन्यांची गर्भवती
Sangli Crime: मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Sangli Crime: मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचारSaam Tv

सांगली - सोशल मीडियावर मैत्री वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. जयदीप चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी २०२१ मध्ये सोशल मीडियावर जयदीपशी ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर ते सातत्याने चॅटींगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

हे देखील पहा -

जयदीपने पीडित तरुणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर मार्च २०२१ मध्ये पीडित मुलगी इस्लामपूर येथे नातेवाईकांकडे आली त्यावेळी ती जयदीपला भेटली. तरुणाने इस्लामपूर एसटी स्टॅण्डवर या तरुणीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर जयदीप मुलीला घेऊन निर्जनस्थळी घेऊन गेला आणि शरीरसुखाची मागणी करत बळजबरी केली. मुलीने नकार देताच जयदीपने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर १५ दिवसांनी पीडित मुलगी गावी निघाली असता पुन्हा त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले.

Sangli Crime: मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया यशस्वी; २ ते ३ दिवसात मिळणार डिस्चार्ज

बस स्टॅण्डवर सोडण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी घेऊन गेला व पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार बलात्कार केला. ७ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पीडित तरुणीने आपल्या आईला सांगितले त्यानंतर तिला दवाखान्यात नेले. त्यानंतर पीडित तरुणी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. पीडित तरुणीने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादीनुसार जयदीप चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com