'तू सदाभाऊंच्यावर टिका करतोस, तुला मस्ती आली आहे'

'तू सदाभाऊंच्यावर टिका करतोस, तुला मस्ती आली आहे'
crime

सांगली : तू सदाभाऊंच्यावर टिका करतोस, तुला मस्ती आली आहे असे म्हणत दमदाटी करुन मारुन टाकण्याची धमकी देणा-या सदाभाऊ खाेत यांचे चिरंजीव सागरसह अभिजित भांबुरे, सत्यजित कदम, स्वप्नील सूर्यवंशी यांच्यावर कासेगाव पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते रवीकिरण माने यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा crime दाखल झाला आहे. sangli-crime-news-police-booked-charged-on-sadabhau-khot-son-raju-shetti-sml80

मी स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टींचे विचार शेतक-यांपर्यंत पाेहचविताे. त्याचा राग मनात धरुन आणि मी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खाेत यांच्यावर शेतक-यांच्या फायद्यासाठी केलेल्या टीकेवरुन माझ्यावर हा प्रसंग आल्याचे माने यांनी सांगितले. चाैघांनी मला माझ्याच घरात घुसून चाकू, तलवार, गुप्ती अशा शस्त्रांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मला शिवीगाळ करुन मारुन ठाण्याची धमकी दिली असेही माने यांनी नमूद केले. मी याबाबत पाेलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

crime
राणेंची चुप्पी; माध्यमांकडे कटाक्षही टाकला नाही

संबंधितांना तातडीने अटक करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी केली आहे. संबंधितांना अटक केली नाही तर मोठे आंदोलन करु असा इशारा खराडेंनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com