सांगली DCC त महाविकास ६, भाजप १, काॅंग्रेसला पराभवचा धक्का

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सांगलीत आहे.
सांगली DCC त महाविकास ६, भाजप १, काॅंग्रेसला 
पराभवचा धक्का
sangli dcc bank election result 2021

सांगली : सांगली (sangli) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) मतमोजणीस आज (साेमवार) प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे दुपार पर्यंत स्पष्ट होणार. या बॅंकेच्या संचालक मंडळातील २१ जागांपैकी तीन जण बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी १८ जागांसाठी मतदान झाले. मतमाेजणी ठिकाणी पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. भाजप (bjp) विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. यापुर्वी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सत्ता होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनेल तर भाजपचे शेतकरी पॅनेल रिंगणात आहेत. sangli district central co-operative bank election result 2021

सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानूसार सात पैकी सहा जागा महाविकास आघाडीने तसेच एक जागा भाजपने पटकाविली आहे.

sangli dcc bank election result 2021
NCP आमदाराच्या पराभवानंतर अजित पवार, शिवेंद्रराजेंचा जयजयकार

वाळवा सोसायटी गटात विद्यमान अध्यक्ष महाआघाडीचे दिलीप पाटील विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे भानुदास मोटे यांचा पराभव झाला. कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार विठ्ठल पाटील यांचा पराभव झाला आहे. तासगाव सोसायटी गटात महाआघाडीचे बी. एस.पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुनिल जाधव व विद्यमान संचालक प्रताप पाटील यांचा पराभव केला.

मिरज सोसायटी गटात महाआघाडीचे विशाल पाटील हे विजयी झाले आहेत. भाजप पॅनेलचे उमेश पाटील यांचा त्यांनी पराभव केला. जत सोसायटी गटात काॅंग्रेसला धक्का बसला आहे. विद्यमान संचालक तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना पराभवास समाेरे (४५-४०) जावे लागले आहे. येथे भाजपचे प्रकाश जमदाडे विजयी झाले आहेत. आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव झाला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com