Maratha Aarkshan : सांगली जिल्हा बंदची हाक; जालना लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचा निर्णय

Sangli News : सांगली जिल्हा बंदची हाक; जालना लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचा निर्णय
Maratha Aarkshan
Maratha AarkshanSaam tv

सांगली : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जालना येथे आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. राज्यभरात याचे पडसाद उमटत असून जालन्यातील (Jalna) लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आता सांगली (Sangli) बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाने हा निर्णय घेत ७ सप्टेंबरला संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. (Live Marathi News)

Maratha Aarkshan
Jalna News: कृषीमंत्री मुंडे, पालकमंत्री सावे हरवले, सापडल्यास संपर्क साधा; जालन्यात शेतकऱ्यांनीच लावले बॅनर

सांगलीमधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आज जिल्ह्यातील मराठा समाजाची बैठक झाली. यात ११ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या मोर्चापूर्वी ७ सप्टेंबरला सांगली जिल्हा बंदचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. जिल्हा बंद पाळण्यात येणार असल्याने ११ सप्टेंबरचा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे.

Maratha Aarkshan
Shirpur News : भूसंपादन कार्यालयात आमदार अमरीश पटेलांची अचानक भेट; अधिकाऱ्यांना दिली तंबी

पुणे-बंगळूर महामार्गही रोखणार 

सांगली जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली आहे. गावागावात कडकडीत बंद पाळून ठिकठिकाणी (Maratha Aarkshan) रास्ता रोको आंदोलन देखील करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातून जाणारे सर्व राज्यमार्ग त्याचबरोबर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर देखील रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com