मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; महिला डॉक्टरला लुटणाऱ्या ५ जणांना अटक

मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी  दरोडा घातला आहे.
मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; महिला डॉक्टरला लुटणाऱ्या ५ जणांना अटक
मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; महिला डॉक्टरला लुटणाऱ्या ५ जणांना अटकविजय पाटील

सांगली : मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी  दरोडा घातला आहे. सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून, चाकू गळ्याला लावून दरोडा टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक महिलेचा ही सहभाग आहे. या पाच जणांकडून एकूण ७ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीतील विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावू दरोडा टाकल्याची घटना ७ दिवसांपूर्वी घडली होती.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. अटकेतील ५ जणांकडून ५ लाख ९७ हजारांचे दागिने, ३७ हजारांचा मोबाईल, ८ हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमित चंद्रकांत पाचोरे (वय- २८) रा. नांद्रे, सचिन शिवाजी फोंडे (वय- २७) रा. नांद्रे, रोहित देवगोंडा पाटील, निखिल राजाराम पाटील आणि पायल युवराज पाटील (वय- ३१) रा. सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर पायल पाचोरे ही डॉ. नाडकर्णी यांच्या ओळखीची होती.

हे देखील पहा-

पायल आणि तिचा मित्र निखिल यांनीच हा कट रचून दरोड्याचा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ५ सप्टेंबर दिवशी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास डॉ. नलिनी नाडकर्णी घरामध्ये एकटया असताना तिघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत २५ तोळे सोने आणि रोख रक्कम लुटली होती. गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळू नये. यासाठी आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणी तपास करणे पोलिसांपुढे आव्हान होते.

मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; महिला डॉक्टरला लुटणाऱ्या ५ जणांना अटक
प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, प्रेयसीसोबत करायचे अश्लील चाळे

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, नलिनी नाडकर्णी यांच्या ओळखीची पायल पाटील होती. नाडकर्णी यांच्या घरी त्यांचे सारखे येणे- जाणे होते. पायल पाटील हिने तिचा मित्र निखिल पाटील याच्या सोबत कट रचून या घरात दरोडा टाकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाचोरे, फोंडे आणि रोहित पाटील यांची मदत घेतली. यावरून नांद्रे, वसगडे, खटाव आणि सांगली या ठिकाणी छापा टाकून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

५ जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी मैत्रिणीच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या पाचही जणांकडून पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले ५ मोबाईल, ४ मोटारसायकली आणि एक कोयता असा एकूण ७ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com