पाेर्णिमा पाटलांना एक कोटी ३६ लाखांना फसविले; ५ जणांवर गुन्हा
crime newsSaamTv

पाेर्णिमा पाटलांना एक कोटी ३६ लाखांना फसविले; ५ जणांवर गुन्हा

सांगली crime news : सांगली येथील उत्तर शिवाजी नगर येथे राहणा-या पौर्णिमा पाटील यांना दुबईमधील ओपीसी फुडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीने एक काेटी ३६ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार पाटील यांनी सांगली येथील विश्रामबाग पाेलिस ठाण्यात नाेंदवली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पाेलिस निरीक्षक अमित पाटील यांनी दिली. sangli-import-export-businessman-poornima-patil-registered-case-on-dubai-mumbai-businessman-sml80

पौर्णिमा पाटील यांच्या तक्रारीनुसार संबंधित कंपनीने माल निर्यातीसाठी ५० टक्के रक्कम अॅडव्हान्स व मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्याने राहिलेली रक्कम देण्याचे ठरले. त्याप्रमाणे सन २०१९ मधील जानेवारी महिन्यात ऑर्डर मिळताच द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे एकूण सात कंटेनर निर्यात केले.

या मालाची रक्कम एक कोटी ५७ लाख रुपये इतकी होते. त्यातील ३० टक्के रक्कम मिळाली. राहिलेली रक्कमेसाठी जलाल या व्यक्तीशी संपर्क साधला असताना त्याने चालढकलपणा केला. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

crime news
साकीनाक्यातील क्रूरकर्त्यास देहदंडाची शिक्षा द्या : उदयनराजे

याबाबत सहायक पाेलिस निरीक्षक अमित पाटील म्हणाले फिर्यादीच्या तक्रारीनुसार दुबईतील ओपीसी फुडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद जुमा हुसेनसह माजीद जलाल, दिलीप जोशी, मंगेश गांगुर्डे (राहणार - मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com