साताऱ्याच्या बोकड चोरटयास इस्लामपूरात अटक; साथीदार फरार

साताऱ्याच्या बोकड चोरटयास इस्लामपूरात अटक; साथीदार फरार
arrest

सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे अट्टल सोनसाखळी आणि बोकड चाेरणा-या अक्षय शिवाजी पाटील यास इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाखांचा मुद्देमाल आणि गुन्हयात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान या गुन्ह्यात हवा असणारा त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेताहेत. sangli-islampur-police-arrested-satara-youth-crime-news-sml80

गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही ठिकाणी किरकोळ चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी तसेच शेळया, बोकड चोरी अशा स्वरुपाचे गुन्हे वाढले हाेते. या गुन्ह्यांचा तपास इस्लामपूर पोलिस करीत हाेते. एका गुन्ह्यात पोलिस पथकास खब-याने दिलेल्या माहितीनूसार एका अट्टल चाेरास पकडण्यात पाेलिसांना यश आले.

arrest
'दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही'

संबंधित संशयित हा सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजताच पाेलिसांनी सापळा लावला. या सापळ्यात संशयित अक्षय शिवाजी पाटील हा पाेलिसांच्या सापळ्यात अडकला arrest. त्याची कसून चौकशी केली असता. त्याने इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतून जनावर चोरी व विविध ठिकाणी साेनसाखळी चाेरल्याचे मान्य केले.

पाेलिसांनी त्याच्याकडून २ लाख रुपयाचा मुद्देमाल आणि गुन्हयात वापरलेली दुचाकी हस्तगत केली. त्याचा साथीदार संशयित आराेपी विजय (संपुर्ण नाव समजू शकले नाही) हा फरार झाला आहे. त्याचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान अक्षय पाटील याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com