Sangli News: पत्नी घरी येत नाही म्हणून दारु पिऊन विजेच्या खांबावर चढला अन्...

तासगाव शहरातील विटा नाका येथे भर रस्त्यातील एका विजेच्या खांबावर मद्यपी पतीचा झिंगाट थरार पहायला मिळाला.
Sangli News
Sangli NewsSaam Tv

सांगली: पत्नी मोहेरी गेल्यानंतर पत्नी परत येण्यासाठी पती काय करतील याचा नेम नाही. आणि पत्नी जर भांडून माहेरी गेली तर पत्नी परत येण्यासाठी पती मात्र वेगवेगळे फंडे करत असतात. सांगलीत (Sangli) मात्र एका पतीने दारु पिऊन विजेच्या तारेवर चढण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील तासगालमध्ये पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून एकाने दारू पिऊन चक्क विजेच्या खांबावर चढून सुमारे तासभर विजेच्या तारांवर सर्कस करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्याला खाली उतरवताना पोलीस (Police) आणि नागरिकांच्या नाकी नऊ आले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर मद्यपी तरुणास खाली उतरवले आहे.

Sangli News
मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा; CM एकनाथ शिंदेंनी स्थगितीचा निर्णय घेतला मागे

तासगाव शहरातील विटा नाका येथे भर रस्त्यातील एका विजेच्या खांबावर मद्यपी पतीचा झिंगाट थरार पहायला मिळाला. प्रशांत माळी नावाच्या तरुणाने पत्नी नांदायला येत नसल्याने थेट विजेच्या खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढू लागला. यावेळी नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. काही नागरिकांनी तात्काळ याची माहिती वीज वितरण विभागाला दिली. यावेळी लगेच वीज वितरणचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी उपस्थित झाले, आणि विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Sangli News
महिला आमदारांना फसवणारे बंटी-बबली अडकले; दोघेही MPSCची करत होते तयारी

विजेच्या (Power) खांबावर चढलेल्या प्रशांतची तारेवर कसरत सुरू झाली होती. सुमारे तासभर प्रशांत हा सर्कशीतील व्यक्तीप्रमाणे विजेच्या खांबावर थरारक कसरत होता. दारुड्याचा हा प्रताप पाहण्यासाठी याठिकाणी नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला

प्रशांत माठी हा तरुण दारुच्या नशेत विटा नाका येथे रस्त्यातील एका विजेच्या खांबावर चढला. यावेळी उपस्थित नागरिकांचा गोंधळ उडाला. नागरिकांनी वेळ न दडवता लगेच वीज वितरण कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी अगोदर त्या खांबावरुन जाणारी वीज बंद केली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com