टेबलावरील पिस्तुलच्या व्हिडिओने शिराेलीतील युवकांचा झाला घात

टेबलावरील पिस्तुलच्या व्हिडिओने शिराेलीतील युवकांचा झाला घात
pistol

सातारा : कराडहून गावठी पिस्तुल pistol खरेदी करुन गावी परतणा-यांना सांगली गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास शिराेली येथील दाेन युवकांना अटक केली. या प्रकरणाचा सखाेल तपास करण्यासाठी या कारवाईबाबत पाेलिसांनी कमालीची गाेपनियता बाळगली आहे.

कराड येथून गावठी पिस्तुल खरेदी करुन गावी परतणा-या शिराेली येथील युवकांना सांगलीच्या एलसीबीने शुक्रवारी (ता.10) ताब्यात घेतले. पिस्तुल खरेदी केल्यानंतर हे युवक आपल्या सांगली येथील मित्रांसमवेत एका ठिकाणी जेवणासाठी थांबले हाेते. त्यावेळी खरेदी केलेले नवे पिस्तूल त्यांनी जेवणाच्या टेबलवर ठेवले. टेबलावर ठेवलेल्या पिस्तुलचा व्हिडिआे व्हायरल झाला. संबंधित व्हिडिआे सांगलीच्या एलसीबीच्या हाती पाेहचला.

pistol
साता-यात 'या' मार्गावर वन वे; पार्किंग व्यवस्थेतही बदल

पाेलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेत संबंधित युवकांपर्यंत पाेहचण्यासाठी व्यूहरचना केली. एका ठिकाणी सापळा लावत त्यांनी दाेन युवकांना ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी केली असता त्यांनी पिस्तुल खरेदी केल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणाचा सखाेल छडा लागावा यासाठी पाेलिसांनी गाेपनियता पाळत एक पथक कराडला रवाना केल्याचे समजत आहे. दरम्यान या कारवाईबाबत सहाय्यक पाेलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी दुजाेरा दिला असून पाळेमुळे शाेधण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. sangli-local-crime-branch-arrested-two-youth-karad-pistol-sml80

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com