अवघ्या तीस हजारात बनवली सेम टू सेम FORD 1930 माॅडेलची गाडी!

देवराष्ट्रेच्या दत्ताभाऊच्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीत आणखी एका गाडीची जोरदार चर्चा; बघा हि भन्नाट चारचाकी!
अवघ्या तीस हजारात बनवली सेम टू सेम FORD 1930 माॅडेलची गाडी!
FORD 1930 carSaamTvNews

सांगली : सांगलीच्या देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ट गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील (Sangli) अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकनी! दता लोहार यांच्या प्रमाणे अशोक यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून ,जुगाड करत ही 1930 सालची ही फोर्ट गाडीची हुबेहूब गाडी बनवली आहे.

हे देखील पहा :

नाव - अशोक आवटी, शिक्षण 7 वी पास, व्यवसाय - गॅरेज चालक :

सांगली-कर्नाळ रोडवरील काकानगर मध्ये टू व्हीलर गाड्या व ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज (Garage) असलेल्या अशोक यांनी केवळ आपल्या कल्पकता आणि 2019 ला सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात You tube वर चे व्हिडिओ पाहून एक घरात एक चार चाकी (Car) गाडी मुलांना खेळण्यासाठी असावी याचे स्वप्न पाहिले. आज दोन ते अडीच वर्षानंतर अशोक आवटीचे स्वप्न प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलय ते या फोर्ट गाडीच्या रुपात! रिक्षा प्रमाणे हँड किक वर सुरु होणारी ही गाडी पेट्रोल (Petrol) वर चालते व 30 किमी इतके मायलेज देते असे अशोक संगाप्पा आवटी यांनी सांगितले.

FORD 1930 car
Pune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात !

सेम टू सेम FORD 1930 माॅडेलची प्रतिकृती अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्तीचा छंद जडला. गॅरेज थाटले आणि गाड्या दुरूस्त करता-करता अनेक वस्तू, मशीन खोलाखोलीचा नाद लागला. वेगवेगळ्या गाड्या माॅडिफाय केल्या. याचं पार्ट त्याला त्याचं याला, अशी उसाबर केली. चांगलं आणि वेगळं बनवायचा प्रयत्न केला. आता चारचाकी गाडी बनवायचं मनावर घेतलं आणि दोन वर्षे खपून पठ्ठ्यानं गाडी तयार केली आहे.

FORD 1930 car
बीडमध्ये दरोडा; महिलांच्या अंगावरील दागिने लुटून, पाच जणांना जबर मारहाण!

भंगारातील  एमएटी गाडीचं इंजिन आणि रिक्षाचे हब आणि आणखी काही पार्टचा जुगाड करून, लोखंडी पत्रा आणि अँगल पासून ही १९३० ची अलिशान FORD साकार झाली आहे. फक्त तीस हजार खर्च आला आहे. गाडीला LED लाइट आहेत. इंडिकेटर, हॉर्न अशी ही सेम टू सेम फोर्ड गाडी आहे असे वजन जवळपास 100 किलो इतके आहे आणि 3 ते 4 जण सहजरित्या या गाडीने जाऊ शकतात.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.