बडोदा बँकेची १७ कोटींत फसवणूक; दोन वर्षानंतर व्‍यवस्‍थापकास अटक

बडोदा बँकेची १७ कोटींत फसवणूक; दोन वर्षानंतर व्‍यवस्‍थापकास अटक
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : मिरजेतील बँक ऑफ बडोदाची 16 कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षानंतर सीएनएक्स कार्पोरेशन लिमिटेड (Mumbai) मुंबईचा एरिया व्यवस्थापक अजित नारायण जाधव (रा. विश्रामबाग) याला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या (Sangli) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Sangli News Bank Fraud)

Sangli News
Jalgaon: ‘नॅक’ मूल्यांकनात उमविची ‘अ’ श्रेणी कायम

मुंबईतील श्री एन. एक्स. कार्पोरेशन कंपनीचे मिरज तासगाव रोडवर कोल्ड स्टोरेज होते. या कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा हळदीचा साठा करण्यात आला होता. हा शेतीमाल (Bank OF Baroda) बडोदा बँकेकडे (Bank) तारण ठेवून शेतकऱ्यांच्या नावे 16 कोटी 97 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्याशिवाय शेतीमालाची विक्री न करण्याचा करारही बँकेने केला होता. मार्च 2017 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान कोल्ड स्टोरेजमधील शेतीमाल बँकेच्या परवानगी विना परस्पर विकण्यात आला. ठेवलेल्या बेदाण्याची विक्री करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे बँक ऑफ बडोदाकडून मुंबईच्या सीएमएक्स कार्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह एरिया व्यवस्थापक आणि काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दोन वर्षांनंतर ताब्‍यात

फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून एरिया व्यवस्थापक अजित जाधव याचा शोध सुरू होता. अखेर आज त्याला अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची कोठडी सुनविण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com