पंचवीस बैलगाडीतून वऱ्हाड लग्न कार्यालय; नवरदेवाने हाकली बैलगाडी

पंचवीस बैलगाडीतून वऱ्हाड लग्न कार्यालय; नवरदेवाने हाकली बैलगाडी
पंचवीस बैलगाडीतून वऱ्हाड लग्न कार्यालय; नवरदेवाने हाकली बैलगाडी
MarriageSaam tv

सांगली : अलीकडच्या काळात लग्न समारंभ आलिशान साजरे होत आहेत. पण अशा वेळी पारंपरिक पद्धतीने पंचवीस बैलगाडीतून वऱ्हाड लग्न कार्यालयात पोहचले आणि सर्वानाच भूतकाळाची आठवण झाली. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोचीमधील नवरदेवाने ही अफलातून वरा काढली. (sangli news bullock cart bridal wedding spot)

Marriage
भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाच घरातील तिघांचा मृत्‍यू

चोरोची येथील आशिष तानाजी यमगर हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचा विवाह (Marriage) नागोळे येथील उच्च शिक्षण घेतलेल्या आशाराणी संजय मासळ यांच्याशी पार पडला. दोघेही सिव्हिल इंजिनिअर आहेत. नवरदेव उच्च शिक्षित असूनही त्यांनी आपल्या लग्नाचे वऱ्हाड तब्बल 10 किलोमीटर बैलगाडीतून (Bullock Cart) चोरोची ते मंगल कार्यालयात आणले.

नवरदेवानेच हाकली बैलगाडी

नवरदेव स्वतः बैल गाडी चालवत होता. बरोबर पंचवीस बैलगाडीचा ताफा होता. आज एकविसाव्या शतकात अनेक कंपनीच्या आलिशान गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. असे असतानाही पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतुन वऱ्हाड निघाले होते. यामुळे ही अनोखी वरात आकर्षणच ठरली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com