Sangli News : आता नेत्यांना नो एंट्री, निवडणुकांवरही बहिष्काराचा निर्णय; मराठा आरक्षणासाठी गावाचा निर्णय

Sangli News : आता नेत्यांना नो एंट्री, निवडणूकांवरही बहिष्काराचा निर्णय; मराठा आरक्षणासाठी गावाचा निर्णय
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तीव्र होत चालला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही; अशी भूमिका घेतली आहे. यात (Sangli) सांगलीच्या पलूस तालुक्यातील धनगाव गावाने ऐतिहासिक निर्णय घेत नेत्यांना नो एन्ट्री केली असून सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Tajya Batmya)

Sangli News
Collector Manisha Khatri: जिल्हाधिकारी पोहचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर; पाऊस नसल्याने जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या भावना

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोर्चा, टायरी पेटवणे, आंदोलन, गाव बंद ठेवण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धनगाव येथील संपुर्ण गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. धनगावमधील युवा वर्गाने मात्र निर्णायक पाऊल टाकले आहे. संयम आता संपल्याचे सांगत सत्तेला मतदार राजाची किंमत दाखवून देण्यासाठी धनगावमध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात येण्यावर बंदी आणि सर्वच निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Sangli News
Eknath Khadse News : कायद्यात दुरुस्ती करून ५० टक्केच्यावर आरक्षण द्यावे; खडसेंचा भाजपला सल्ला

गावही ठेवले बंद 

धनगावच्या शिवतिर्थावर याबाबतचे निवेदन सकल मराठा तरूणांच्यावतीने सरपंच यांना देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणास पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आले होते. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com