Sangli Farmers News: दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट ठरतयं वरदान; पिवळ्या रंगाच्या ड्रॅगनला मिळतोय अधिक दर

Sangli Dragon Fruit Farming: सांगलीच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतलं आहे.
Sangli Dragon Fruit Farming
Sangli Dragon Fruit FarmingSaamtv

Sangli Farmers News:

आतापर्यंत आपण लाल- पांढरे आणि लालसर ड्रॅगन फ्रुट पाहत आलो. मात्र सांगलीच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतलं आहे. विशेष म्हणजे या पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटला लालसर रंगाच्या ड्रॅगन फ्रुट पेक्षा जास्त दर मिळतो आहे.

Sangli Dragon Fruit Farming
Nandurbar News: पुलाचे काम अपूर्ण, बोटही बंद.. नर्मदा नदीतून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

जत (Jat) सारख्या दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुट हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेले आहे. मात्र जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचे देखील उत्पादन घेतले आहे. आधी व्हाईट ड्रॅगन फूड महाराष्ट्रात आणलं गेले. व्हाईट ड्रॅगन फूड सुरुवातीला 12 वर्षांपूर्वी साधारणता दीडशे दोनशे रुपये किलो प्रमाणे विकले जात होते.

त्यानंतर रेड ड्रॅगन फूट आलं त्याच्यानंतर जम्बो ड्रॅगन फूड आले. आता सध्याच्या मार्केटला 100 ते 150 रुपये पर्यंत रेड ड्रॅगन फूड चालू आहे. 70 ते 80 रुपये व्हाईट ड्रॅगन फूड चालू आहे. पण येलो ड्रॅगन फ्रुट नवीन असल्यामुळे मालाची आवकही कमी असल्यामुळे सांगली मार्केटमध्ये एका किलोला 230 ते 250 रुपये पर्यंत दर मिळत आहे.

ड्रॅगन फ्रुटचा चौथा बहार संपत आला असून आता पाचवा बहार लवकरच सुरु होणार आहे. ड्रॅगन फुटच्या वाढत्या मागणीमुळे दरातही वाढ होत आहे. गेल्या महिन्यापेक्षा चालु महिन्यात ड्रॅगन फ्रुटच्या दरात प्रति किलोस ५० ते ६० रुपयांची दर वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..

राज्यात गतवर्षी १० हजार टन ड्रॅगन फ्रुटची विक्री झाली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ड्रॅगन फ्रुटला प्रति किलो १०० ते १६० रुपये असा दर मिळाला होता. दिवाळीपर्यंत ड्रॅगन फ्रुटचे दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले. कमी खर्चात अपेक्षित दर मिळत असल्याने राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढत आहे.. यातच आता पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फूडचे देखील उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. (Latest Marathi News)

Sangli Dragon Fruit Farming
Maharashtra Rain Alert: गणपती बाप्पाचं आगमन पावसाने होणार; आजपासून 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com