Sangli News: जोरदार वाऱ्यामुळे द्राक्ष बाग भुईसपाट; १५ लाखांचे झाले नुकसान

Agriculture News: जोरदार वाऱ्यामुळे द्राक्ष बाग भुईसपाट; १५ लाखांचे झाले नुकसान
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची (farmer) दोन एकर द्राक्ष बाग जोरदार वारे वाहू लागल्याने भुईसपाट झाली. यामुळे महादेव रंगराव जगताप यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे (Sangli News) नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली बाग कोसळल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. (Latest Marathi News)

Sangli News
Karad : नऊ लाखांची फसवणूक झाल्याने क-हाडातील युवकाची आत्महत्या; स्टेटसची गावात चर्चा

कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी गावातील महादेव रंगराव जगताप या शेतकऱ्याचे खरशिंग हद्दीमध्ये दोन एकर क्षेत्र द्राक्ष बाग होती. आठ दहा दिवसांत द्राक्ष बाग सुरू होणार होती. अतिशय परिश्रम घेवून जगताप यांनी यावर्षी चांगली बाग आणली होती. सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला व बघता बघता बाग एका झपाट्यात खाली कोसळली.

१३ लाखाचे कर्ज

बाग कोसळल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. यामध्ये पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. महादेव जगताप यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. त्यांनी सोसायटीतून पाच- सहा लाख रुपये तसेच बँकेतून सात लाख रुपये असे कर्ज काढून द्राक्ष बाग लावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com