Sangli Maratha Morcha News: आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार! सांगलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा; लाखोंचा सहभाग

Sangli Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षण तसेच जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
Sangli Maratha Kranti Morcha For Reservation:
Sangli Maratha Kranti Morcha For Reservation:Saamtv

Sangli Maratha Kranti Morcha:

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. सांगलीमध्ये आज (१७, सप्टेंबर) मराठा समाजाच्या वतीने भव्य मराठी क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण तसेच जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते

Sangli Maratha Kranti Morcha For Reservation:
Tapi River Flood: तापी नदी धोक्याच्या पातळीवर; नदी काठावरच्या गावांना सावधानतेचा इशारा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक मराठा एक लाख मराठा म्हणत सांगलीमध्ये (Sangli) मराठा समाज एकवटला. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून जिजाऊ वंदनाने मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. आसपासच्या भागातील मराठी बांधवांचा मोठा सहभाग या मोर्चामध्ये पाहायला मिळाला.

त्याचबरोबर माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) माजी मंत्री विश्वजीत कदम आमदार मानसिंग नाईक आमदार पाटील यावेळी उपस्थित होते. मोर्चात सहभागी होणाऱ्या बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी वाटप करण्यात येणार आहे. लिंगायत समाजाकडून अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले या मागण्यांचे निवेदन

1) ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या जातींचे फेरसर्वेक्षण करुन या यादीतून प्रगत जातीना वगळण्यात यावे. राज्यातील ओबीसी जातींची संख्या व त्यांच्या लोकसंख्येची जनगणना करुन सर्वेक्षण करा.

2) राज्यातील फुगीर आरक्षण कमी करुन मराठा समाजाचा गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार 50% ओबीसीमध्ये समावेश करावा.

3) 19/12/2018 च्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षण अंतर्गत अन्याय झालेल्या PSI- राज्यसेवा 2017. RTO 2017 मधील महिलांना शासकीय सेवेत समावून घ्या. तसेच EWS TO PSI 2020, SEBC TO EWS महाराष्ट्र इंजिनियरिंग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम उमे नियुक्त्यांचा प्रश्न सोडवा.

4) समांतर आरक्षण व खुला सर्वसाधारण गटात अर्ज, दावा आणि स्पर्धा करणाऱ्या उमेदवार प्रवर्गात समावेश करणारा कायदा बनवून ओपनमध्ये संरक्षण द्या.

5) मराठा तरुणांच्या शैक्षणीक अडचणी व वस्तीगृहाचे प्रश्न सोडवा

(6) अण्णासाहेब पाटील सक्षम बनवून तरुणांना येणाऱ्या अडचणी सोडवा.

7) सारथी संस्थेला मनुष्यबळ व वाढीव निधी देऊन MOA नुसार सर्व योजना सुरू करा. (Latest Marathi News)

Sangli Maratha Kranti Morcha For Reservation:
Kalyan Dombivali News: गणेशोत्सवाआधी पोलीस प्रशासन अलर्ट, कल्याण डोंबिवलीत 'ऑल आऊट ऑपरेशन'; १०० जणांविरोधात कारवाई, १० अटकेत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com