Sangli Snake News: शेतकरी आणि नाग दोघेही विहिरीत पडले, मग नागाने जीव वाचवण्यासाठी घेतला शेतकऱ्याच्या मृतदेहाचा आसरा

Sangli Snake News: शेतकरी आणि नाग दोघेही विहिरीत पडले, मग नागाने जीव वाचवण्यासाठी घेतला शेतकऱ्याच्या मृतदेहाचा आसरा
Sangli Snake News
Sangli Snake Newssaam tv

>> विजय पाटील, साम टीव्ही

Sangli snake and farmer fell into well: रात्री शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आणि त्यानंतर एका सापाने जीव वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या मृतदेहाचा आसरा घेतल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. जत तालुक्यात जिरग्याळ येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील जिरग्याळ येथे दोन आठवड्यापूर्वी रवींद्र संकपाळ हे शेतकरी आपल्या शेतामध्ये गेले होते. रात्रीच्या सुमारास विहिरीमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. तीन दिवसानंतर संकपाळ यांचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत असल्याचे आढळून आलं.

Sangli Snake News
Dombivli Crime : तिघांनी एकत्र दारू ढोसली, नंतर मित्राची हत्या केली; पुन्हा त्याच जागेवर पेग भरले

खोल असणाऱ्या विहिरीत उतरण्याची कोणतीच सोय नसल्याने मृतदेह बाहेर कसा काढायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर मोठ्या संख्येने गावकरी विहिरीजवळ जमले आणि मृतदेह काढण्यासाठी खटाटोप सुरू केला. पण मृतदेहाच्या अंगावर एक नाग फणा काढून बसल्याचे गावकऱ्यांना दिसले. हे पाहून सगळ्यांना धक्काच बसला.

पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण आता पाण्यात तरंगत असणारा मृतदेह काढण्यासाठी विहिरीमध्ये कोण उतरणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण पाण्यात पडलेला नाग आपला जीव वाचवण्यासाठी शेतकरयाच्या मृतदेहावर बसून होता. त्यामुळे विहिरीमध्ये उतरण्यासाठी कोणीच धजावत नव्हतं. (Breaking News)

Sangli Snake News
New Parliament Video: भव्य दिव्य अप्रतिम! संसदेच्या नवीन इमारतीची पहिली झलक समोर! पाहा व्हिडिओ

अखेर सर्पमित्र रोहन शेलार आणि मोहसिन शेख घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अत्यंत धाडसाने या दोघा सर्पमित्रांनी विहिरीमध्ये उतरून मृतदेहाच्या अंगावर फणा काढून बसलेल्या नागाला अलगदपणे उचलून घेतलं आणि त्यानंतर विहिरीच्या बाहेर काढत जंगलात सोडून दिले. दरम्यान नागाला विहिरीतून रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल चांगलाचा व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com