आगार प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून चालकांने ओतले अंगावर डिझेल; अनर्थ टळला

आगार प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून चालकांने ओतले अंगावर डिझेल; अनर्थ टळला
आगार प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून चालकांने ओतले अंगावर डिझेल; अनर्थ टळला
Sangli News, Sangali Latest Marathi NewsSaam Tv

सांगली : मिरजेत आगार प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून एसटी चालकांने अंगावर डीझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मर्जीतील कर्मचाऱ्यांना जादा काम देत असल्याचा एसटी (St Bus) चालकांचा आरोप करत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने महामंडळमध्ये खळबळ मजली आहे. (sangli news Tired of the depot chief's trouble the driver poured diesel on his body)

Sangli News, Sangali Latest Marathi News
मांजर समजून चिमुकल्यांनी घरी आणलं बिबट्याचं बछडं; ८ दिवस घरच्यांनीही केला सांभाळ, त्यानंतर...

मिरज एसटी वर्क शॉपमध्ये बुधवारी (Sangli News) एसटी चालक मेहबूब मौला आंबेकरी यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. गेले अनेक दिवस आगर प्रमुख हे आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना एसटीच्या फेऱ्या देत आहेत. मात्र चालक मेहबूब आंबेकरी यांना काम मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी (MSRTC Bus) एसटी वर्कशॉपमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली. (Sangali Latest Marathi News)

काम नसल्‍याने अनेक कर्मचारी जातात परत

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे एसटीची चाके रूळावर येत असताना हा प्रकार घडल्यामुळे कर्मचाऱ्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. मिरज एसटी आगारात आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना अधिकारी एसटीच्या जादा फेऱ्या देत आहेत. मात्र अनेक कर्मचारी दिवसभर बसून काम न मिळता परत जात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महिन्यांचा पगार कमी पडत असल्याचा आरोप चालक आंबेकरी यांनी केला आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांत मेहबूब आंबेकरी यांच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आगर प्रमुख शिवाजीराव खांडेकर यांनी तक्रार दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.