वाळू तस्करीची मुजोरी..चक्क महिला तहसीलदाराच्या गाडीवरच घातली गाडी

वाळू तस्करीची मुजोरी..चक्क महिला तहसीलदाराच्या गाडीवरच घातली गाडी
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील तहसीलदारांच्या शासकीय वाहनांवर आटपाडी- मुढेवाडी रोडवर रात्री वाळू तस्कराकडून हल्ला करण्यात आला. तहसीलदार माने यांच्या मोटारीवर डंपर घालून तहसीलदाराना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. (sangli news valu maffia vehicle was put on the vehicle of the woman tehsildar)

Sangli News
रोडरोमिओला शिकविला धडा; विद्यार्थिनींनी दिला चपलेचा प्रसाद

सांगली (Sangli) जिल्ह्यात वाळू तस्करी फोफावली आहे. नदीमधून वाळू बेकायदा उपसा केली जात आहे. यासाठी आटपाडीच्या तहसीलदार धाडसी लेडी सिंघम बी. एस. माने यांनी यासाठी कारवाई सुरू केली आहे. अनेक कारवाया त्यांनी केल्या आहेत. तहसीलदार कार्यालयसमोर अनेक वाळूच्या गाड्या पडून आहेत.

भरधाव वेगाने डंपर आले अन्‌

रात्री तहसीलदार श्रीमती माने या अवैध वाळू (Sangli News) वाहतूक रोखण्यासाठी पथकासह गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे समजले. पथकाने त्याचा पाठलाग केला. तर अचानक डंपरने चकवा दिला. त्याच ठिकाणी थोड्यावेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि तहसीलदार यांच्या गादीवर डंपर घातला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप आहेत. कोणीही गंभीर जखमी नाही आहे. मात्र डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. तर डंपरचालक पोलिसांच्या (Police) ताब्यात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com