पितृपक्षात भाजीपाला तापला.. गवाराचे भाव किलोला ८० तर वांगी १२० रुपये किलो

पितृपक्षात भाजीपाला तापला.. गवाराचे भाव किलोला ८० तर वांगी १२० रुपये किलो
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : गणेशोत्सव काळात महाप्रसादामुळे भाज्यांच्या मागणीत वाढ होऊन भाजीपाला महागला होता. आता पुन्हा पितृपक्षातही दरांचा आलेख चढतच आहे. त्यामुळे या काळातही नागरिकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. सांगलीत (Sangli) भाजीपाल्याची पेट्रोलशी स्पर्धा सुरु आहे. गवारीचा भाव किलोला 80 रुपयांवर तर वांगी आणि शेवगा 120 रुपये किलो असून (Petrol) पेट्रोल 106 रुपये लिटर इतके आहे. (Sangli News Vegetables Price)

Sangli News
डेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना

सध्या सणांचा काळ सुरू आहे. यंदा निर्बंधमुक्त उत्सवास परवानगी दिल्यामुळे सर्वत्र (Ganesh Festival) गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महाप्रसादाचे प्रत्येक मंडळामार्फत आयोजन केले होते. त्यामुळे अचानक (Vegetable) भाजीपाल्याला मागणी वाढली. त्यामुळे दरात वाढ झाली. उत्सव संपताच पितृपक्ष सुरू झाला. गणेशोत्सवात भाजीपाल्याची मागणी कायम राहिली. मात्र आवकेत मोठी घट झाली. त्यात पावसामुळेही शेतीत पाणी साचून राहिल्याने भाजीपाल्याच्या आवकेला झटका बसला. अशा अनेक कारणांनी सध्या भाजीपाल्याचे दर वाढत आहेत.

भाजीपाला दर

शेवगा 120 रुपये किलो, वांगी 120 रुपये किलो, गवार 80 रुपये होलसेल, दोडके 80 रुपये किलो, कारले 80 रुपये किलो, मिरची 50 रुपये किलो, कोबी 50 रुपये, फ्लॉवर गड्डा 40 नग, टोमॅटो 40 रुपये, बटाटे 40 रुपये, कांदे 30 रुपये किलो, मेथी 30, कोथंबीर 50.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com