Sangli News: महिला झाल्या आक्रमक; मोर्चा काढत ग्रामपंचायतवर फोडल्‍या बाटल्‍या

महिला झाल्या आक्रमक; मोर्चा काढत ग्रामपंचायतवर फोडल्‍या बाटल्‍या
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : दारू विक्रेते जोमात आणि माणसं कोमात..अशीच अवस्था (Sangli News) सांगलीच्या जत तालुक्यातील बाज येथे झाली आहे. गावातील अनेक तरुण आणि पुरुष मंडळी व्यसनाधीन होत आहेत. अक्षरशः हा दारू पिऊन रस्त्यावर पडत आहेत. त्यामुळे महिलांनी एकजूट होत आज अवैध दारू विक्रेत्यावर महिला आक्रमक झाल्या. यानंतर (Gram Panchayat) ग्रामपंचायतवर मोर्चा काढत ग्रामपंचायतच्या दारात दारूच्या बाटल्या फोडल्या. (Latest Marathi News)

Sangli News
Accident News: रस्‍त्‍यावर उभ्‍या कालिपिलीला दुधाच्या गाडीची जोरदार धडक; सात व्यक्ती गंभीर जखमी

बाज (जि. सांगली) गावामध्ये गेले अनेक वर्ष झाले दोन नंबरने दारू विकली जात आहे. या दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि दारू बाज गावांमधली पूर्णपणे बंद व्हावी. यासाठी आज महिलांनी मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान गावातील महिला एकजूट होत रोडवरती आल्या आणि आपला संताप व्यक्त केला.

अवैध दारू विक्री बंद करा

चक्क ग्रामपंचायतच्या समोर दारूच्या बाटल्या फोडल्या. पोलीस म्हटलं की जनतेचा रक्षक असतो आणि बाज गावामध्ये हप्ते घेऊन अवैध दारू विकली जाते. तर लवकरात लवकर जत पोलीस स्टेशन यांनी अशा अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून बाज गावातील महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी बाज गावातील नागरिकांकडून महिलांकडून होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com