Sangli News : काेल्हापूर जिल्ह्यातील युवकास सांगलीत अटक; चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पाेलिसांनी अटक केलेला युवक काेल्हापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
sangli
sanglisaam tv

Sangli News : सांगली (sangli) येथे दहा घरफोड्यांसह तेरा दुचाकी चोरीचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे पाेलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तौफिक जमादार (वय २९, उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ) असे अटक (arrest) केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Sangli Latest Crime News)

sangli
Satara News : फळकूट दादांना पाेलिसांनी चाेपले, काेयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी

संशयित हा कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील आहे. तौफिक जमादार याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी (police) व्यक्त केली आहे. त्याच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती व मुद्देमाल मिळून आला.

sangli
Satara News : एलसीबीची माेठी कामगिरी, दहिवडीतील 'ती' चाेरी उघडकीस; नऊ लाखांचे साहित्य जप्त

तौफिक जमादार याची पाेलिसांनी सखोल चौकशी केली. महात्मा गांधी पोलिस चौकीत त्याच्यावर घरफोडीचा, कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले. तौफिक जमादार हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com