Sangli कौटुंबिक वादातून मुलाने घातली वडिलांच्या डोक्यात पार; खून करून आरोपी फरार!

मिरज मध्ये कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज कुपवाड रोड होमगार्ड प्रशिक्षक केंद्राजवळ ही घटना घडली आहे.
Sangli कौटुंबिक वादातून मुलाने घातली वडिलांच्या डोक्यात पार; खून करून आरोपी फरार!
Sangli कौटुंबिक वादातून मुलाने घातली वडिलांच्या डोक्यात पार; खून करून आरोपी फरार!विजय पाटील

सांगली : मिरज मध्ये कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज कुपवाड रोड होमगार्ड प्रशिक्षक केंद्राजवळ ही घटना घडली आहे. किसन जोतिराम माने (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, किसन हे घरी एकटे असताना मुलगा विजय किसन माने हा वडिलांच्या डोक्यात पार घालून खून करून पळून गेला आहे.

हे देखील पहा :

किसन यांच्या पत्नी शेळ्यांना फिरविण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर त्यांना दरवाज्या समोर पडलेला पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी मुलगा हा पळून जाताना दिसल्याचे सांगितले. मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर मिरज गांधी चौकी पोलीस ठाणे रविराज फडणीस यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून खुनातील पार हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे.

Sangli कौटुंबिक वादातून मुलाने घातली वडिलांच्या डोक्यात पार; खून करून आरोपी फरार!
16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनांना कल्याण-शीळ रोडवर नो एंट्री!

आरोपी विजय माने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. घरात मयत किसन माने त्यांची पत्नी मुलगा विजय हे तिघेच राहत होते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पण कौटुंबिक वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, विजय माने यांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com