सांगली : ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर राजा पाटील काळाच्या पडद्याआड!

शाहीर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांचे वयाच्या ७० व्या वर्षात निधन झाले.
सांगली : ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर राजा पाटील काळाच्या पडद्याआड!
Shahir Raja Patil SaamTvNews

सांगली : नावाजलेल्या तमाशामध्ये विद्रोही लेखणीने तमाशा क्षेत्रातून करमणुकीच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणारे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) येथील शाहीर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांचे वयाच्या ७० व्या वर्षात निधन झाले. त्यांच्या निधनाने तमाशा (Tamasha) क्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले आहे.

हे देखील पहा :

शाहीर राजा पाटील (Shahir Raja Patil) यांनी १९९० च्या दशकात तमाशा आणि शाहीरी लोककला महाराष्ट्रभर सादर करुन लोककलेचा जागर केला होता. शाहीर राजा पाटील यांनी काळू बाळू तमाशा मंडळ, गणपत व्ही.माने चिंचणीकर, दत्त महाडीक पुणेकर, रघुवीर खेडकर, काताबाई सातारकर, या.तमाशांना वगनाट्य दिली व ती महाराष्ट्रभर गाजली.

Shahir Raja Patil
हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर!

या टोपी खाली दडलंय काय, बारा हजाराची कमळी, खेकडा चालला दिल्लीला, रक्तात नाहाली आब्रु, कायदा गाढव हाय, तुकोबा निघाले वैकुंठाला, इंदिरा काय भानगड, राजा हरिश्चंद्र , डॉ.शर्मा, संत एकनाथ, संत दामाजी, भक्त पुंडलिक, ही वगनाट्य महाराष्ट्रभर (Maharashtra) गाजली. माणूस माणसाचा वैरी, बापू बिरु वाटेगावकर, कृष्णा मिळाली कोयनेला अशी नाटकेही शाहीर राजा पाटील यांनी लिहून अजरामर केली.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com