Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!
Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!Saam Tv

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय ७) आणि लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय ११) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय ६) हा बचावला आहे.

Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!
Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!

हे देखील पहा :

ऐवळे कुटुंबिय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात रहात होते. मोलमजुरी करून ऐवळे कुटुंब जगते. आज सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. दोन मुली आणि एक मुलगा हे घरात होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी आणि एक भाऊ असे तिघे मिळुन ओढ्यात आंघोळ करण्यासाठी गेले.

Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!
Sangli Breaking : ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच

परंतू , पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहीणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याचवेळी त्यांच्या सोबतच पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणाऱ्या संभाजी माने या युवकाने पाहीले आणि त्यांने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com