लेझीम, योगा, नृत्यातून महिलांनी लुटला विठ्ठल भक्तीचा आनंद
sangli

लेझीम, योगा, नृत्यातून महिलांनी लुटला विठ्ठल भक्तीचा आनंद

सांगली : कोरोना महामारीच्या काळात पंढरपूरला pandharpur जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे सांगली sangli नजीकच्या मिरज येथील महिलांनी लेझीम, योगा आणि नृत्य या माध्यमातून नऊवारी साड्या नेसून विठ्ठल भक्तीचा आनंद लुटला. या आषाढी वारीचा आनंद महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लेझीम आणि योगाच्या माध्यमातून घेतला आहे. (sangli-women-ashadi-ekadashi-navvwari-saree-dance-sml80)

कोरोना महामारीमुळे वारी निघाली नाही. त्यामुळे असंख्य वारकरी निराश झाले आहेत. वारक-यांसह भाविकांना घरातूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागत आहे. देशावर जे कोरोनाच संकट आले आहे ते दूर होऊ दे अशी साद पांडुरंगाकडे घातली जात आहे.

sangli
मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता; विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती खूष

या कोरोना महामारीत महिलांत आरोग्य टिकून राहावे यासाठी नियमित योगासने व नृत्य याचा खूप उपयोग होतो. योगासनांमुळे ऑक्सिजनची पातळी टिकण्यास मदत होते. तसेच निराश झालेल्या मनाला नृत्यामुळे ताजगी मिळते. मन प्रफुल्लित होते. कोरोनामुळे विठुरायाच्या दर्शनाला सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे त्यांना इथूनच साष्टांग दंडवत घालत नमस्कार या महिलांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com