'आमचं नशीब नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते अन् राऊत...'

'आमचा प्रयत्न होता की पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे, संजय राऊत यांचीच अडचण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.'
'आमचं नशीब नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते अन् राऊत...'
Sanjay RautSaam TV

नाशिक : आमचं नशीब नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठनेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले, 'महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडूण येण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला मात्र, मविआला अडचण असं काही नाही.

मविआने (MVA) बहुमत सिद्ध केलं तेव्हा आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा होता. शेवटचा उमेदवार ३९ मतांवर राहिला एकूण जर बेरीज केली तर आमची एकूण संख्या १६६ च्या वर आहे. ही निवडणूक प्रक्रिया किचकट होती. आमचा प्रयत्न होता की पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) यांचीच अडचण होते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती असं भुजबळ म्हणाले.

हे देखील पाहा -

ते म्हणाले, 'सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० मतांची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो, पवारांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली, मविआचा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. तिथल्या आमदाराला तो दुखावला जाणार नाही, त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. एकोप्याने पुढे जावं लागेल विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीत देखील भाजप खेळ करू पाहत आहे असही ते यावेळी म्हणाले.

भाजपाने आधी ४ नंतर ६ उमेदवार सांगितले आमचे ६ उमेदवार निवडणून येतील असे आम्हाला पहावं लागेल. पवारांनी कौतुक केलं म्हणण्यापेक्षा त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायला पाहिजे. लोकांना जवळ करण्यासाठी त्यांचे काम केले पाहिजे. मविआच्या आमदारांना , जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावं जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे आम्ही एकमेकांच्या टांगेत टांग टाकता कामा नये. नाहीतर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात तोपर्यंत कोणी बोलत नाही असंही ते म्हणाले.

Sanjay Raut
'अब्दुल सत्तारांनी राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली, विधानपरिषद निवडणुकीतही मदत करतील'

शिवाय संजय राऊत काठावर वाचले, आमचं नशीब नाहीतर, उलट झालं असत संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते. आम्ही तर आमच्या लोकांना सगळं समजावून सांगितलं होतं. मात्र त्यातून या चुका कशा झाल्या, काय माहिती नाही असंही भुजबळ म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com