संजय राठोडांची मंडळात पुन्हा वर्णी लागण्यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच साकडं
संजय राठोडांची मंडळात पुन्हा वर्णी लागण्यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच साकडंसंजय राठोड

संजय राठोडांची मंडळात पुन्हा वर्णी लागण्यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच साकडं

शिवसैनिक गिरीष व्यास  सायकलने पोहोचणार ठाकरेंच्या स्मृती स्थळावर 

संजय राठोड

यवतमाळ - माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड Sanjay Rathod यांची पुन्हा मंत्री मंडळात वर्णी लागावी यासाठी यवतमाळ Yavatmal येथील ५२ वर्षीय शिवसैनिक गिरीष व्यास Girish Vyas यवतमाळ टू मुंबई Mumbai असा प्रवास सायकलने Cycle करून शिवाजी पार्क Shivaji Park येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या Balasaheb Thackeray समाधीचे दर्शन घेऊन साकडं घालण्यासाठी ते यवतमाळ वरून रवाना झाले आहे. मृतक पुजा चव्हाण आत्महत्या संदर्भात माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या वर भाजपने गंभीर आरोप केल्यानंतर राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

हे देखील पहा -

यवतमाळ जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणुन संजय राठोड यांची ओळख आहे. गंभीर आरोप झाल्याने राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी गिरीष व्यास हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जावून साकडं घालणार आहे. विशेष म्हणजे या आधी देखील शिवसैनिक गिरीष व्यास यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून यवतमाळ ते तुळजापुर असा प्रवास साकयलने करून आई तुळजा भवानीला साकडं घातलं होतं.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com