संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य... (पहा व्हिडीओ)

यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीच तसे संकेत दिलेत. त्यामुळे पुन्हा संजय राठोड हे मंत्री होणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य... (पहा व्हिडीओ)
संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य... (पहा व्हिडीओ)Saam Tv

माधव सावरगावे

मुंबई : पूजा चव्हाण Puja Chavan मृत्यूप्रकरणी वन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना आमदार संजय राठोड Sanjay Rathod यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता बळावली आहे. यवतमाळ Yavatmal जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत Uday Samant यांनीच तसे संकेत दिलेत. त्यामुळे पुन्हा संजय राठोड हे मंत्री होणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. Sanjay Rathore will soon be in the cabinet

सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक सूचक विधान केलं आहे, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आत्ता आहे. लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असे उदय सामंत म्हणले आहेत.

राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजकीय दबावापोटी संजय राठोड यांना वन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मी कोणताही गुन्हा केला नाही, सत्य येईल असं त्यावेळी त्यांनी निक्षून सांगितलं होतं.

या वर्षाच्या फेब्रुवारी- मार्च महिन्यात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. पुण्यातील वानवाडीमध्ये पूजा चव्हाणने ८ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येनंतर ऑडिओ क्लिप्सने राज्यात धुमाकूळ घातला. त्यावरून यांच्यावर आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेवटी वाढत्या राजकीय दबावामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता चार महिन्यांनंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, भाजपने या मुद्द्यावरून पुन्हा उद्धव सरकारला इशारा दिला आहे.

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य... (पहा व्हिडीओ)
पेट्रोल आणि डिझेल किंमत ४ शहरात काय किंमत आहे. जाणून घ्या

आता विरोधक कितीही काही बोलत असले तरीही शिवसेना मागे हाटेल असं वाटत नाही. म्हणूनच शिवसेनेच्या उदय सामंत यांनी दिलेल्या संकेताने चर्चा जोरात सुरु झाली आहे. कारण नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १२ भाजप आमदारांचे वर्षभरासाठी करण्यात आलेले निलंबन महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलेले असल्यामुळेच शिवसेनेच्या पंखात हे बळ आलंय की काय? असे म्हणायला बरासचा वाव आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com