Sanjay Raut News : हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाईवर संजय राऊत भडकले; म्हणाले, मुलुंडचा पोपटलाल...'

२०२४ ला या लफंगांना जनता रस्त्यावर पकडून मारेल. जगात देशात अशा घटना घडल्या आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv

Sanjay Raut : राजकीय सूडबुद्धीने कारवाया सुरू आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेच्या पदावर नसतील पण ते शिवसेनेच्या परिवारातले आहेत. हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. सहकार क्षेत्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना खूप महत्त्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या आधी त्यांना अटक होणार असे मुलुंडचे पोपटलाल बोलत होते, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे. (Political News)

हसन मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळी ईडीची धाड पडली. गेल्या दीड महिन्यांत त्यांच्या घरावर पडलेली ही दुसरी धाड आहे. तसेच सदानंद कदम यांना देखील काल अटक करण्यात आली. या सर्व घडामोडींवर संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut On Shinde Group : "पोलिसांच्या आड हल्ले करू नका, समोर या" राऊत यांचा शिंदे गटाला इशारा!

सदानंद कदम यांना अटक करण्याचे कारण काय आहे ? असा प्रश्न विचारत संजय राऊत पुढे म्हणाले की, 'खेडची सभा यशस्वी होण्यामागे असंख्य लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम आहेत. खेडमधील शिवसेनेची सभा यशस्वी केल्यामुळे हा खेळ खेळला गेला आणि सदानंद कदम यांना अटक करण्यात आली,'

Sanjay Raut
Ratnagiri News: रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्टप्रकरणी मोठी कारवाई

'अटक करण्याची बातमी ईडीने देण्याऐवजी मुलुंडचे पोपटलाल जाहीर करतात, हे कसं काय? हसन मुश्रीफ FIR कॉपी सगळ्यात आधी त्यांना मिळते. त्यानंतर ईडी सीबीआय चौकशी करते. लालू यादव यांच्या घरावर देखील धाडी झाल्यात. ते नुकतेच एका आजारातून बरे येत आहेत. त्यांच्या पत्नी, मुलं, त्यांची गर्भवती सून यांची सोळा सोळा तास चौकशी केली जात आहे. किरीट सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करायला हवी. मात्र त्यांना क्लीन चिट देण्यात आली, अशी टीका संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे.

जनता पकडून मारेल...

'जनता आमच्या सोबत आहे. भविष्यात सत्तेचा कोणी अमर पट्टा घेऊन आलेला नाही हे लक्षात ठेवावे. सत्ता येते सत्ता जाते २०२४ ला तुम्हाला हे दिसेल.२०२४ ला या लफंगांना जनता रस्त्यावर पकडून मारेल. जगात देशात अशा घटना घडल्या आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com