
Sanjay Raut: शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प पळवून का नेले? असा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारला पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. (Latest Sanjay Raut News)
" पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत तर त्यांचे स्वागतच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून मोदींना सव्वा दोन किंवा अडीच कोटींचे उद्योग महाराष्ट्रातून कसे पळवून नेले हे विचारले पाहिजे. जर ते हे उद्या सांगू शकले तर महाराष्ट्रावर उपकार होतील, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे.
मोदी ज्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत ती सर्व कामे महाविकास आघाडीच्या काळातली आहेत. एका अर्थाने पंतप्रधान आमच्याच कामांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी येत आहेत, असं देखील राऊत म्हणाले.
बाप चोरणारी टोळी
२३ जानेवारी रोजी मुंबईतील विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे संजय राऊतांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, "उद्धव ठाकरे म्हणतात ते खरंच आहे. ही खरोखर बाप चोरणाऱ्यांची टोळी आहे."
डॉक्टरांवर केलेल्या विधानाबद्दल देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. " महाराष्ट्रात सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे. कोरोना काळामध्ये डॉक्टरांचां तुटवडा पडत होता. तरीही डॉकटर काम करत होते माझ्या बोलण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील मात्र मला असं म्हणायचं होतं की, डॉक्टरांचा तुटवडा पडत होता तरी ते काम करत होते. पांढऱ्या कपड्यातले ते आपल्यासाठी एक देवदूत आहेत असेच आम्ही आपण सांगत होतो.", असे संजय राऊत म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.