Sanjay Raut News : राज्यात शिवसेनेची गुढी पुन्हा फडकणार, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास; केंद्रावर साधला निशाणा

नवीन वर्षामध्ये शिवसेनेच्या स्वाभिमानाची गुढी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरावर फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSaam Tv

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी म्हणून ज्या शिवसेनेचा उल्लेख केला जातो, त्या शिवसेनेच्या गुढीवर केंद्र सरकारने ज्याप्रकारे मोगलाई पद्धतीने आक्रमण केलं. त्यामुळे राज्यातील जनता दु:खी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.  (Maharashtra Breaking News)

Sanjay Raut Latest News
Bacchu Kadu News : बच्चू कडूंना मोठा धक्का; चांदूरबाजार निवडणुकीत पॅनलनचा उडाला धुव्वा, काँग्रेसचा विजय

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने संकल्प केला आहे, की नवीन वर्षामध्ये शिवसेनेच्या स्वाभिमानाची गुढी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरावर फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना भवनासमोर मनसेने लावलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या बॅनवरही संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली.

"या देशात लोकशाही आहे, सामान्य नागरिक सुद्धा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. जर आपल्याकडे बहूमत येत असेल, तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. बहुमत हे चंचल असतं. आज आमच्याकडे असेल, उद्या दुसऱ्याकुणाकडे तरी असेल. त्यामुळे बहुमताच्या खेळावर कुणी अवलंबून राहू नये", असं राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

Sanjay Raut Latest News
Beed News : खेळता-खेळता शेततळ्यातील पाण्यात उतरले; एकाच कुटुंबातील तिघेही बुडाले, हृदयद्रावक घटना

'शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची गुढी दिसत नाही'

महाराष्ट्रातील जनता गुढीपाडव्याचा सण साजरा करत आहे. मराठी नववर्षामुळे ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जात आहेत. वातावरण अत्यंत उत्साहाचं आहे. तरीही गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस गारपीटीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिके पूर्णपणे झोपून गेली आहे. त्यामुळे त्याच्या जीवनात नवीन वर्षाच्या आनंदाची गुढी दिसत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

दादा भुसे यांची दाढी का जळाली?

दादा भुसे यांच्याकडे फार लक्ष द्याची गरज नाही. त्यांच्या दाढीला आग लागली आहे. ती ते विझवण्याच्या मागे आहेत. मी त्यांच्यावर व्यक्तीगत आरोप कधीच केला नाही. मी कुणावरही व्यक्तीगत आरोप करत नाही. मालेगाव भागातील शेतकरी १ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरलेले आहेत. गिरणा अँग्रो शुगर कंपनीच्या नावाने कोट्यावधी रुपयांचे शेअर्स जमा करण्यात आलेले आहेत. माझ्या हिशेबाने १७५ कोटी ५० लाखांचे ते शेअर्स आहेत. त्याचा भुसे यांनी हिशेब द्यावा, शेतकरी हिशेब मागत आहेत. हिशेब मागितल्यावर तुम्ही दाढी का जळाली, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com