हे स्वातंत्र्य आहे.. लढून मिळालं आहे भिकेतुन नाही- राऊतांचा कंगनाला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं आहे.
हे स्वातंत्र्य आहे.. लढून मिळालं आहे भिकेतुन नाही- राऊतांचा कंगनाला टोला
हे स्वातंत्र्य आहे.. लढून मिळालं आहे भिकेतुन नाही- राऊतांचा कंगनाला टोला Saam TV

अभिजित सोनावणे

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं आहे. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप BJP आणि अभिनेत्री कंगना रणावतला Kangana Ranaut लगावला आहे. ते आज नाशिक मधून बोलत होते.

राऊत यावेळी म्हणाले, दीड वर्षांपासून शेतकरी तणाव दबावात होता त्या जोखडातून बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंगना रानौत यांच्या स्वातंत्र्यबद्दलची व्याख्या वेगळी असेल. शेतकरी मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. यांनी गाड्या अंगावर घातल्या, गुंड पाठवले मात्र शेतकरी हटला नाही.

हे स्वतंत्र्य आहे... हे लढवून मिळालं आहे भिकेतुन नाही असाही टोला यावेळी संजय राऊतांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याला लगावला आहे. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनी ने गोळ्या घातल्या तसच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडले असे राऊत लखीमपूर हिंसाचार घटनेबद्दल भाष्य केलं.

हे स्वातंत्र्य आहे.. लढून मिळालं आहे भिकेतुन नाही- राऊतांचा कंगनाला टोला
"तू मला पसंत नाहीस, म्हणत तोंडी तलाक देत नवविवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

...म्हणून शिंदेंना उमेदवारी

विधान परिषदेसाठी सुनील शिंदे यांना तिकीट जाहीर करण्यात आल आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, सुनील शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांच्याजागी सुनील शिंदे यांना संधी मिळाली आहे. रामदास कदम यांच्यावर पक्षनेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी ठाकरे परिवारावर दाखवलेल्या निष्ठेच हे फळ आहे. रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिप वर बोलणार नाही ते आमदार मंत्री होते पक्षाचं नेतृत्व देखील आहे केलं

ST कर्माचाऱ्याचे प्रश्न सुटावेत;

परिवहन मंत्री दिवस रात्र यात लक्ष घालताय. आम्हाला अस वाटत ST कर्माचाऱ्याचे प्रश्न सुटावे, आणि ते सोडवले देखील आहे. विलानीकरन हा एकच विषय राहायला असून हायकोर्टाचे काही निर्देश आहे त्या नुसार ते काम करतील.

निडणुकीत पराभव होईल या भीतीने निर्णय;

कायदे रद्द झाले सद्भभावनेने नाही शेतकरी मागे हटायला तयार नाही. ज्या १३ राज्याच्या पोट निवडणुकांन मध्ये भाजपच परभाव झाला आणी उद्याच्या पंजाब आणी उत्तर प्रदेशच्या निडणुकीत पराभव होईल या भीतीने निर्णय घेण्यात आला आहे असा टोला राऊतांनी कृषी रद्द केल्याबद्दल भाजपला लगावला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com